अवघ्या 10,000 रुपयांपासून सुरु करता येण्यायोग्य व्यवसाय
1.शिकवणी केंद्र
सुरवातीला कोणताही खर्च नसल्याने हा एक प्रभावी व्यवसाय आहे. शिकवणी घेणारे बहुतेक शिक्षक आपल्या घरातूनच शिकवण्या घेतात, त्यामुळे जागेच्या भाड्यासाठी काहीही खर्च येत नाही.
2.फोटोग्राफर
जर तुमचा व्यवसायिक फोटोग्राफर बनण्याचा हेतू आहे आणि तुम्ही आधीच चांगला DSLR घेतला असेल आणि तुम्हाला फोटो काढण्यामध्ये खूपच रुची असेल तर मग हा व्यवसाय तुम्ही सहज करू शकता.पुढील खर्चाचा विचार न करता स्वतंत्र फोटोग्राफर बनून तुम्हाला फक्त ऑनलाईन जाहिरात करायची आहे.
3.ट्रॅव्हल एजन्सी
आजकाल प्रवासी उद्योगाचं खूप फॅड आहे. तुम्ही घरातच एखादी ट्रॅव्हल एजन्सी सुरु करू शकता आणि तिला मुख्य ट्रॅव्हल एजन्सीला जोडू शकता. असे करण्याने तुम्ही खूप जलद गतीने सुविधा मिळवू शकता. या ट्रॅव्हल एजन्सीच्या व्यवसायातून उत्तम कमिशन मिळू शकते. तुम्ही हा व्यवसाय खूप कमी किंमतीत म्हणजे 10,000 रुपयांमध्ये देखील सुरु करू शकता.
4.मोबाईल रिचार्ज शॉप
बहुतेक लोक रिचार्ज करण्यासाठी रिचार्जच्या दुकानाला भेट देणे पसंत करतात. त्यामुळे हा व्यवसाय करणे खूप सहज शक्य आहे. तुम्ही एखादी छोटीशी जागा भाड्याने घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता. जर तुम्ही महाग ठिकाणी जागा घेतली नाहीत, तर तुमचे एकूण भांडवल 10,000 रुपयांच्यावर जाणार नाही_
5.युट्युब चॅनेल
युट्युब चॅनेल हे कमी आर्थिक गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यासाठी उत्तम साधन आहे. युट्युब हे प्रतिभावान व्यक्तींसाठी खूपच चांगले व्यासपीठ आहे. युट्युब चॅनेलवर आपली कला सादर करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
6.कार्यक्रम नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट)
जर तुम्ही नेट्वर्किंग आणि व्यवस्थापनात निपुण आहात तर हा व्यवसाय तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला अनेक ठिकाणे एकाच वेळी सांभाळायची असतात. कार्यक्रम प्रायोजक, जमवाजमव आणि इतर कामासाठी तुम्हाला 24 तास तत्पर राहावे लागते.
7.ब्लॉगिंग
हे कदाचित डिजिटल युगात प्रवेश करण्यासाठी सर्वात आकर्षक क्षेत्रांपैकी हे एक आहे. व्यवसायिक ब्लॉगिंगसाठी फक्त कमीत कमी प्रारंभिक भांडवल गरजेचे आहे. तुम्हाला फक्त डोमेन नेम आणि होस्टिंग स्पेस मध्ये गुंतवणूक करायची आहे.
8.जेवणाचे डब्बे पुरवणे
अन्न उद्योगात प्रवेश करणे हा नेहमीच एक फायदेशीर मार्ग आहे. शहरात एकटे राहून काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना जेवणाची गरज भासते. सध्याची जोडपी देखील नोकरी करत असल्याने, सकाळी उठून जेवण बनवणे त्यांना जमत नाही किंवा आवडत सुद्धा नाही. तेव्हा हे सर्व लोक डब्बा सेवेचा लाभ घेतात.
9.गारमेंट टेलर
कोलकत्ता, मुंबई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हाताने बनवलेल्या डिझाइनच्या मागणीमध्ये १० पटीने वाढ झाली आहे. आजकाल हँडमेड डिझाइनचे कपडे खूपच प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय खूप लवकर यशस्वी होऊ शकतो आणि त्या व्यवसायाला भांडवल सुद्धा खूपच कमी लागते._
10.स्क्रिप्ट लेखन
मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतंत्र पटकथालेखक खूप प्रसिद्ध आहेत. ते कुठल्याही प्रसंगी आणि कुठल्याही वेळेत काम करण्यास तयार असतात.या व्यक्ती मुदतींवर काम करतात आणि एका कराराद्वारे प्रोडक्शन हाउसशी संलग्न असतात. तुम्हाला ही कला अवगत असल्यास तुम्ही यामध्ये करियर करू शकता.
Related News